राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच शरद पवार मातोश्रीवर; संजय राऊत म्हणतात..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. पवार ठाकरे भेट हि अतिशय गुप्तपणे पार पडली आणि त्यांच्यात २ तास चर्चा झाली अशी माहिती आज समोर आली आहे.

राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच पवार मातोश्रीवर गेले असल्याचे बोलले जात होते. भाजप नेते नारायण राणे यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यपालांना भेटून काल केली होती. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकार आपला ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणार आहे. कालची शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक हि औपचारिक बैठक होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतले. पंतप्रधान मोदीही वेळोवेळी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतात. पवार हे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे त्यांची कालची भेट हि केवळ मार्गदर्शनपर चर्चा करण्यासाठी होती असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या राज्यपाल भवनाच्या भेटी मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. तसेच विरोध पक्षीयांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर पवार ठाकरे भेटीने अनेकांना बुचकळ्यात पडले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment