केन्द्रीय मंत्र्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये; पोलिसांच्या नोटीसीवर राऊतांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांच्या गायब झाल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. तर दुसरीकडे कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही हजर होण्याबाबत आज नोटीस बजावली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू नये. महाराष्ट्रातील पोलीस गुन्हेगार पाताळात जरी लपला असेल तरी त्याला शोधून काढतील, राणे राऊत यांनी म्हंटले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील घडामोडींकडे पाहिले तर काल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पोलिसांना जो आरोपी हवा होता. त्याचा पोलिसांकडून अजूनही शोध घेतला जातो आहे. अशावेळी त्या आरोपीबाबत आपल्याकडे माहिती असेल तर ती देऊन पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक होते. ते सर्वांचे काम आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते एकेकाळी मुख्यमंत्रीही होते. पोलिसांना माहिती दिली नसल्याने त्यांच्यावर आता गुन्हेगाराला लपवणे, त्याची माहिती न देणे त्याला आश्रय देणे या संदर्भात त्याच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो.

या राज्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे. महाराष्ट्रातील पोलिसांकडून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रातील पोलीस सक्षम आहेत. ते गुन्हेगार पाताळात लपला तरी त्याला शोधून काढता, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

Leave a Comment