“काश्मिरी पंडितांच्या हातात एके 47 द्या अशी बाळासाहेबांची भूमिका होती”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “द काश्मीर फाईल्स” या सिनेमाच्या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणतात कि काश्मीरचं सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. जे घडलं ते सत्य दाबलं गेलं. ते कधीचं बाहेर आलं नाही. ते तर ‘द काश्मीर फाईल्स’चे प्रचारकच आहेत. आणि ”काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र, एके 47 द्या, अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्यांनी तशी मागणीही केली होती. त्यावेळी बाकी सगळे अतिरेक्यांच्या भीतीने गप्प होते. पण आता 32 वर्षांनी काश्मिरच्या पंडिताची आठवण का आली.?” असा सवाल राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी चित्रपटाचे प्रचारक असल्याचे त्यांनी द काश्मीर फाईल्स बाबत आपले मत मांडले. वास्तविक खरे हे आहे कि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून द काश्मीर चित्रपटाचा वापर केला जात आहे. काश्मीरच्या वेदना यांना काय कळणार. त्या तर शिवसेनेला माहित आहेत.

वास्तविक पाहता काश्मिरातील प्रश्नावर आणि काश्मिरी पंडितांच्या वेदनेवर सातत्याने आवाज उठवणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या काळातील एकमेव नेते होते. ते केवळ आवाज उठवून थांबले नाहीत तर महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यानंतर काश्मीर पंडितांचे शिष्टमंडळ जेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा काश्मिरी पंडितांची अस्वस्थता त्यांनी पाहिली.

त्यांनी विचारलं मी तुमच्यासाठी काय करू शकतो? माझ्या हातात शस्त्र असती तर माझ्या शिवसैनिकांना शस्त्र घेऊन तुमच्यासाठी पाठवले असते. त्यावेळी त्यांनी काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या, अशी जाहीरपणे मागणी केली होती. त्यांच्या हातात एके 47 द्या अशी मागणी आणि भूमिका शिवसेना प्रमुखांची होती, असे राऊत यांनी म्हंटले.