गोव्याच्या राजकारणाची सूत्रे भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रासह गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणाही साधला. “आमची लढाई हि प्रस्थापितांविरूद्ध आहे. गोव्यातील राजकारणाची सूत्रे ही भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात आहेत, असे विधान राऊत यांनी यावेळी केले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यात निवडणूक लढविण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तर आघाडी आहे, काँग्रेसही आमच्यासोबत आहे. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी उमेदवाऱ्या देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केले. गोव्यात हे होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.

गोव्याच्या राजकारणाबद्दल सांगायचे झाले तर मोजक्याच दहा-बारा लोकांकडून गोव्याचे राजकारण केले जात आहे. आणि हि लोक कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामध्ये भूमाफिया, ड्रग्ज माफिया यांचाही समावेश आहे. भाजपात अशा क्षेत्रातील लोक गेलेले आहेत कि ज्यांचा संबंध ड्रग्ज माफियांशी आहे. आणि या लोकांचे नाते भ्रष्टाचाराशी आहे. आम्ही या प्रस्थापित, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया याच्या विरोधात उमेदवार उतरवणार आहोत, असे राऊत यांनी म्हंटले.

Leave a Comment