….तरच मी कंगणाची माफी मागण्याबाबत विचार करेन – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटू लागली आहे? असं खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना रणावतला टीकाकारांना समोर जावं लागलं. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगणा राणावत मध्ये शाब्दिक युद्ध झालं. नुकत्याच एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर ‘हरामखोर मुलगी’ म्हणून टीका केली. त्यांच्या या टिप्पणीवर अनेकांनी आक्षेप घेतला. संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. त्यावर जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी ‘एएनआय’शी बोलताना दिली.

“तिने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं. हेच अहमदाबादबद्दल बोलायची तिच्यात हिंमत आहे का?”, असा सवाल राऊतांनी यावेळी केला. संजय राऊतांनी कंगनावर ‘हरामखोर’ अशी टिप्पणी केल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झा, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत ते विधान योग्य नसल्याचं म्हटलं. दिया मिर्झाने राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे संतापाची लाट उसळली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like