एसटी संपाविषयी पवार साहेबांशी सकारात्मक चर्चा- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. एसटी कामगारांचा संप, अमरावती हिंसाचार, तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर पवारांसोबत चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, एसटी संपाविषयी शरद पवारांशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच तोडगा निघेल अशी आशा राऊतांनी व्यक्त केली.

एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांचीएसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे. एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतेय? आणि का भडकवतेय? त्यामागील हेतू काय आहे, हे सर्वांना माहित आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण आणि का करतेय? यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न आमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत असा आरोप संजय राऊत यांनी नाव न घेता भाजपवर केला

Leave a Comment