शिवसेना गोव्यामध्ये लढवणार तब्बल ‘एवढ्या’ जागा; संजय राऊतांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेने आता आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. गोव्यात शिवसेना 20 ते 25 जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. स्वबळावर लढल्याने पक्षाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान शिवसेनेमुळे गोव्यात भाजपची कोंडी होणार असल्याचं दिसून येत आहे.

गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. पुढील वर्षी गोवा विधानसभेच्यान निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना नेहमीच गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असते. सध्या गोव्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेस असला तरी सरकार मात्र भाजपचे आहे.

दरम्यान, शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवले होते. बिहारमध्ये शिवसेनेच्या उमदेवारांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. त्यानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला फायदा होऊ नये आणि राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार यावं म्हणून शिवसेनेने हा निर्णय घेतला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment