ये रिश्ता बहोत पुराना है; राऊतांकडून बाळासाहेबांसोबतचे जुने फोटो ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हे नातं खूप जुने आहे…. ये रिश्ता बहोत पुराना है…. असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी,प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी! असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे. त्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्याखाली हे नातं खूप जुने आहे…. ये रिश्ता बहोत पुराना है साहेब …. विनम्र अभिवादन ! जय महाराष्ट्र! असं कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी!, असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.