पवार- ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमित शहांना संजय राऊतांनी धु- धु धुतलं; म्हणाले, गुजरातचा एक व्यापारी…

sanjay raut on amit shah
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार हे भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह (Amit Shah) यांचा जोरदार समाचार घेतला आहे. अमित शाह याना गृहमंत्री म्हणायला आम्हाला लाज वाटते अशा शब्दात संजय राऊतांनी अमित शहांवर हल्लाबोल केला. शरद पवारांचं कौतुक मोदींनीच केलं आहे… तुमची त्यांना पुरस्कार दिला. मग मोदी आणि अमित शहा यांच्यात भांडण आहे का? असा सवालही संजय राऊतांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल घाणेरड्या भाषेत वक्तव्य करून निघून जातो हा या महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी नेत्यांबद्दल द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली उकळी आहे. शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे सर्वजण अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. ज्यांच्यामुळे पवार साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सर्वजण आता आपल्या सोबत आहेत हे अमित शाह याना माहित नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केला.

शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल मोदी सरकारनेच पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्य पुरस्कार त्यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे, पवारांचं बोट धरूनच मी राजकारणात आलो असेही मोदी म्हणाले होते. आज अमित शाह त्याच शरद पवारांवर टीका करत आहेत याचा अर्थ मोदी आणि शहा यांच्यात भांडण झालंय, मतभेत झालेत असा टोला संजय राऊतांनी लगावला.

यावेळी संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंवरील टिकेचाही खरपूर समाचार घेतला. आम्ही तुमच्यासारखं पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खाऊन आलो नाही, पाकिस्तानात जाऊन जीनांच्या कबरीवर फुले उधळणारे आम्ही नक्कीच नाही असा टोला राऊतांनी लगावला. या देशातील राष्ट्रवादी मुस्लिमांची बाजू मांडणं यात काय चूक नाही. देशात अनेक संघर्षाच्या काळात मुस्लिमानीही बलिदान दिले आहे. पण महारष्ट्रातील पराभव अमित शाह यांच्या जिव्हारी लागला आहे म्हणून ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत असं संजय राऊतांनी म्हंटल.