Thursday, October 6, 2022

Buy now

सोमय्यांना स्वप्नातील बंगले दिसतात, हा तर भुताटकीचा प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी सोमय्यावर कडक शब्दात निशाणा साधला. किरीट सोमय्या याना स्वप्नातही बंगलेच दिसतात, हा तर भुताटकीचा प्रकार असा टोला त्यांनी लगावला.

ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्यांबाबत तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या कोर्लईला जाणार आहेत. त्यावरून संजय राऊत याना विचारले असता राऊत म्हणाले, सोमय्याच्या स्वप्नात बंगले येतात, वेडा झालाय तो. त्याला स्वत:चे बंगले स्वप्नात दिसत आहेत. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. बांधकाम नाही. याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी देखील नाईक यांना धमक्या दिल्या आहेत. अर्णबला बिल पाठवायचं नाही, त्यांना पैसे मागायची नाही अशा प्रकारे त्यांना बोलावून सोमय्यांनी धमक्या दिल्या. यानंतरच अन्वय नाईकांनी आत्महत्या  केली, असा आरोप राऊत यांनी केला आहे.