शरद पवारांना धमकी देण्याइतपत काही जणांना माज आलाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना थेट धमकीच दिली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका करत हीच का भाजपची संस्कृती असा थेट सवाल केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवारांना धमकी देण्यापर्यंत काही जणांना माज आलाय. शरद पवारांना घरी जाऊ देणार नाही अशी धमकी देणारा महाराष्ट्रात कोण असेल तर हीच का भाजपची संस्कृती असा सवाल त्यानी मोदी- शहाना केला. पवारांच्या वयाचा मान ठेवता येत नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला नालायक आहोत अस राऊत म्हणाले.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले-

माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल अस राणे म्हणाले होते.