शरद पवारांची भूमिका शेतकरी हिताचीच ; ‘त्या’ पत्रावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी देखील या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच 2010 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी या कायद्या बाबत लिहिलेलं पत्र भाजपने उकरून काढून पवारांनाच घेरण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या त्या पत्रावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. पवारांनी १० वर्षांपूर्वी शेती कायद्यातील सुधारणेची भूमिका मांडली तेव्हा त्यात शेतकरी हिताचाच विचार होता. असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी केलं आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. हे कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांची कृषी कायद्यांबाबतची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

पवारांनी १० वर्षांपूर्वी शेती कायद्यातील सुधारणेची भूमिका मांडली तेव्हा त्यात शेतकरी हिताचाच विचार होता. त्यावेळी अंबानी-अदानी यांनी शेती क्षेत्रात प्रवेश केला नव्हता. बड्या उद्योगपतींचा हा पसारा गेल्या ६ वर्षात वाढला आहे. शेतीमालाविषयी नवे धोरण आणि कायदे शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारे आहे. सर्व काही तोट्यातच चालले आहे. शेती पिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात झालेली भरमसाठ वाढ व त्यामानाने मिळणारे कमी दाम यामुळे शेती ही किफायतशीर राहिलेली नाही, तर धोकाच बनला आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment