हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या वडिलांचा पुतळा देखील सरकारच्या खर्चाने उभारला आहे, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केल्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावरून यांच्या पोटात दुखत असेल तर अफझलखानप्रमाणे यांच्या पोटाचं ऑपरेशन करावा का? असा सवाल संजय राऊतांनी केला. यावेळी संजय राऊतांनी (Sanjay Raut) देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला. कालच्या प्रकाराची देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे असं राऊतांनी म्हंटल. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे फक्त उद्धव ठाकरेंचे वडील नाहीत तर महाराष्ट्राचा बाप आहे. नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरेंबद्दल इतकी नमकहरामी करणार असतील तर मला वाटत यासारखे दुर्दैव नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद दिले, सर्व पदे दिली, प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही येत असाल तर मला असं वाटत उद्याचे जोडो मारो आंदोलन योग्य आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावरून यांच्या पोटात दुखत असेल तर अफझलखानप्रमाणे यांच्या पोटाचं ऑपरेशन करावा का? असा सवाल संजय राऊतांनी केला. ज्याने महाराष्ट्राला स्वाभिमान दिला, अस्मिता दिली, लढायला शिकवलं त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासंदर्भात प्रश्न निर्माण करताय?कुठे फेडाल हे पाप असं म्हणत संजय राऊतांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, नारायण राणे यांनी काल राजकोट किल्य्यावर पोलिसांवर आरेरावी केली, त्यावरून संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केलं. महाराष्ट्रातील संस्कृती आणि संस्कार फडणवीसांच्या काळात पूर्णपणे उद्धवस्त झालेला आहे. मालवणामध्ये जे झालं तो महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. कालच्या प्रकाराची देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे. पोलिसांची प्रतिष्ठा ते राखू शकले नाहीत. खुले आम भरस्त्यावर पोलिसांची वर्दी फाड्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला, मग या सर्व गोष्टींचे गृहमंत्री समर्थन करतात का ? असा सवाल संजय राऊतांनी केला. काय तर बोलण्याची स्टाइल आहे त्यांची. मग आम्ही बोलतो तर आमच्यावर का गुन्हे दाखल करता? असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर आपला संताप व्यक्त केला.