शरद पवारांचे आभार, ते उद्धवजींच्या मागे ठामपणे उभे राहिले- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात शरद पवारांचे आणि काँग्रेसचे आभार मानले होते.

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हंटल की, मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं. स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. ठाकरे सरकार अल्पमतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वेचाही राजीनामा दिला.उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार,असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Comment