नेमकं काय घडलं; संजय राऊतांचे ट्विट व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत भाजप आणि बंडखोरांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये आपल्याच लोकांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे त्यांनी सूतोवाच केलं आहे. नेमक हेच घडलं आहे असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले. संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर आता बंडखोर आमदारांच्या गटाकडूनही प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांचेही आभार मानले. मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले.मार्गदर्शन केलं. स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही असे संजय राऊत यांनी म्हंटल.

Leave a Comment