हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sanjay Raut । हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज १३ वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. त्यातच आज शिवसेनेची बुलंद तोफ, खासदार आणि मातोश्रीचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल झाले. खरं तर संजय राऊत मागील काही दिवसापासून एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. तरीही ते आज बाळासाहेब ठाकरेंसाठी शिवाजी पार्कवर आले. संजय राऊतांना पाहून शिवसैनिक अक्षरशः भारावून गेला, भावुक झाला.
संजय राऊतांना गंभीर आजार –
खरं तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करत माहिती दिली होती कि ते एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. डॉक्टरांनी त्यांना काही महिने लोकांच्यात न मिसळण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक दिवसापासून त्यांची रोजची पत्रकार परिषद सुद्धा बंद आहे. मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी संजय राऊत यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी भेट दिली आणि अभिवादन केलं. संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि विक्रोळीचे आमदार सुनील राऊत सुद्धा होते. संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यांचं शरीर थकलेलं वाटत होत. मात्र तरीही त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क गाठलं. हा क्षण शिवसैनिकांसाठी अतिशय भावनिक असा क्षण होता.
संजय राऊत म्हणजे शिवसेना खरा आवाज Sanjay Raut
दरम्यान संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून समजले जातात. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसवण्यात संजय राऊत यांचाच सिंहाचा वाटा होता. शिवसेनेची अधिकृत भूमिका तर ते मांडतातच, याशिवाय विरोधकांना ते आपल्या कठोर वाणीने आणि लेखणीने घायाळ करतात. २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर संजय राऊत शिंदे गट आणि भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेत होते. देवेंद्र फडणवीस असो वा पंतप्रधान नरेंद्र मोदी … संजय राऊतांची तोफ रोज सकाळी धडाडताना उभा महाराष्ट्र पाहत असतो. संजय राऊत हे मधल्या काळात तुरुंगातही जाऊन आले मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. आजही ते शिवसेनेचा आवाज म्हणून ओळखले जातात. संजय राऊत जे काही बोलतात ती शिवसेनेची अधिकृत भूमिका असते असं मानलं जातं. मात्र आज हेच संजय राऊत एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याने शिवसैनिक चिंतेत आहे. राऊत लवकरात लवकर बरं होवो अशा प्रार्थना शिवसैनिकांकडून केल्या जात आहेत.




