पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत; राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही पुरावे दाखवत विधानसभेत जोरदार बॅटिंग करत ठाकरे सरकारला अक्षरशः तोंडावर पाडले. दरम्यान यावरून शिवसेना खासदार यांनी सामना अग्रलेखात आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा रोखठोक इशारा संजय राऊत (Sanjay raut) यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

अंबानी परिवाराच्या घराबाहेर एक संशयास्पद गाडी उभी राहते, त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू लगेच होतो, विधानसभेत त्यावर चार दिवस गदारोळ होतो हे सर्व रहस्यमय प्रकरण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहे. या सर्व प्रकरणातील गुप्त माहिती विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे सगळ्यात आधी पोहोचत राहिली. सरकारसाठी हे शुभसंकेत नाहीत, असं रोखठोकमध्ये म्हटलंय.

मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, पण सगळ्यांनाच पाण्यात राहायचे आहे. माशाशी वैर का करायचे असे सगळ्यांनाच वाटू लागले तर राज्याचा प्रवाह गढूळ होईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment