“भाजपकडून संजय राऊतांच्या जीवाला धोका”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दरम्यान आता संजय राऊत याचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. भाजपकडून संजय राऊत यांच्या जीवास धोका आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

आमदार सुनील राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शिवसेना खासदार व आमचे बंधू संजय राऊत यांच्या मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केली आहे. अजूनही संजय राऊत यांच्या जीवाला धोका आहे. ईडी हि भाजप नेते व केंद्र सरकारच्या आदेशाने काम करत आहे. त्यांच्या आदेशावरूनच काल संजय राऊतांवर कारवाई करण्यात आली आहे.

केंद्र सरकार व भाजपच्या आदेशाने ईडीकडून ज्या कारवाया होत आहरेत. त्या महाराष्ट्रातील मराठी नेते व मराठी माणसावर होत आहेत. आणि या कारवाया कोणाच्या आदेशावरून व कोणाच्या सांगण्यावरून होत आहरेत हे महाराष्ट्राला चांगले माहीत आहे. ज्याप्रकारे राऊतांकडून भाजप मधील नेत्याच्या घोटाळ्याबाबत बोलले जात आहे त्याप्रमाणे राऊतांचे भाजप बरे वाईट काहीही करू शकते असे वाटत असल्याचे राऊत यांनी सांगितले.