“झुकेंगे नही… जय महाराष्ट्र”; संजय राऊतांचे ट्विटद्वारे भाजपला आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून थेट सक्तवसुली संचलनालयाला आव्हान दिले आहे. दरम्यान त्यांनी सकाळी भाजपवरही निशाणा साधल्यानंतर नवे ट्विट केले आहे. ‘झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…’, असे लिहीत त्यांनी भाजपला आव्हान दिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये एका डरकाळी फोडणाऱ्या वाघाचे चित्र टाकले आहे. आणि त्या ट्विटमधील फोटोवर त्यांनी ‘झुकेंगे नही.. जय महाराष्ट्र…’, असा मजकूर लिहला आहे. राऊतांनी अशा प्रकारचे ट्विट करीत आपण लवकरच काहीतरी राजकीय धमाका करणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

दरम्यान, आज जेव्हा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवाईवरून केंद्रातील भाजपवर निशाणा साधला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करणार असून ईडीच्या अधिकाऱ्यांवरच आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे आहेत. या अधिकाऱ्यांचे बाहेर वसूली एजंट आहेत. त्यांच्या माध्यमातून ईडीचे अधिकारी खंडणी गोळा करतात. मला आणि ठाकरे परिवाराला ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे, असा आरोपही राऊतांनी केला आहे.

Leave a Comment