ट्रक आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञाचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. ट्रकवर इनोव्हा कार धडकून झालेल्या भीषण अपघातात डॉक्टरांसह अख्ख्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर इनोव्हा गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातात सीमा भागातील संकेश्वर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञासह त्यांच्या पत्नी आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे, डॉ. श्वेता सचिन मुरगुडे आणि श्रेया सचिन मुरगुडे अशी या अपघातात मृत पावलेल्याची नावे आहेत. सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हत्तरकीजवळील बेनकोळी गावाच्या परिसरात हा अपघात झाला होता.

नेमका कसा घडला अपघात ?
डॉ. सचिन मुरगुडे हे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून परिचित होते. संकेश्वर येथे मुरगुडे यांचे नेत्र रुग्णालय आहे. त्यांची पत्नी श्वेतासुद्धा नेत्ररोग तज्ज्ञ होत्या. रविवारी संध्याकाळी डॉ. सचिन, पत्नी श्वेता आणि त्यांची मुलगी श्रेया इनोव्हा कारने बेळगावहून संकेश्वरला येत होते. यादरम्यान पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर हत्तरकी जवळ बेनकोळी गावाजवळ डॉ. सचिन मुरगुडे यांचा कारवरील ताबा सुटला आणि त्यांची इनोव्हा कार रस्त्याच्या शेजारी थांबलेल्या मालवाहू कंटेनरवर जाऊन आदळली.

दोघींचा जागीच मृत्यू
ही धडक एवढी भीषण होती की डॉ. श्वेता आणि श्रेया यांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉ सचिन हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यमकनमर्डी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment