व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यातल्या तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात, निर्बंधांमुळे आली उपासमारीची वेळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे, निर्बंध शिथील झाल्यानंतर तमाशा फड सज्ज झाले, मात्र पुन्हा निर्बंध लागू झाल्याने, आता या तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या पन्नास दशकांपासून तमाशा क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या सांगलीच्या कवलापूरचा काळू-बाळू तमाशा फड सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून वेळेची मदत अथवा तामशा कलावंतांच्या समोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्राची लोक परंपरा असणारा तमाशा हा कोरोनाच्या चक्रव्यूहात सापडला आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे तमाशाचे फड बाहेर पडले नव्हते, जत्रा यात्रा यांच्यावर निर्बंध असल्याने तमाशाचे कार्यक्रम बंद होते, अशा या संकटानंतर काही महिन्यांपूर्वी तमाशांना राज्य सरकारने परवानगी दिली, जत्रा यात्रा सुरू झाल्या,मात्र आता पुन्हा कोरोनाचे कडक निर्बंध लागू झाल्याने तमाशा कार्यक्रमांवर बंदी आली आहे . गेल्या पन्नास वर्षांपासून महाराष्ट्राच्या तमाशा या क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या कवलापूरच्या काळू-बाळू तमाशा फडाची अवस्था फारच बिकट झाली आहे.

महाराष्ट्राला लोक कलेची परंपरा देणगी स्वरूपात काळू-बाळू यांच्या तमाशा फडामुळे मिळाली.मात्र आता या काळूबाळूच्या तमाशा फडावर कोरोनाचे पुन्हा संकट कोसळले आहे. काळुबाईची आरती सरी पिढी आज तमाशाची परंपरा चालवत आहे.जत्रा-यात्रा पुन्हा सुरू झाल्याने काळूबाळूचा तमाशा फड पुन्हा सज्ज झाला होता.पण पुन्हा निर्बंध लागू झाल्याने काळू-बाळू तमाशा फड नव्हे तर महाराष्ट्रातल्या इतर तमाशा फड देखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. चित्रपटांना व नाटकां प्रमाणे अटी व शर्ती घालून जशी परवानगी देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर तमाशाला ही परवानगी द्यावी,अशी मागणी करण्यात येत आहे.