मोठी बातमी! संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींनी 14 दिवसांची पोलीस कोठडी

0
108
Santosh Deshmukh murder case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलीसांनी पुण्यात अटक केली आहे. याच्यासह या दोघांना मदत करण्यात दोघांना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे, आज या घटनेप्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी सांगितले की, आरोपींनी हत्येपूर्वी अवादा कंपनीच्या प्रकल्पस्थळी जाऊन संतोष देशमुखला धमकावले. त्याला दमदाटी केली. यावेळी दोघी गटात हाणामारी झाली. यानंतर एकेदिवशी संतोष देशमुख यांना अडवून आरोपींनी पुन्हा मारहाण केली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणातील तपासाच्या अनुषंगाने सीआयडीच्या एसआयटी टीमने आरोपींना 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. मात्र आरोपींच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला आहे. आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.