Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींकडून हत्येची कबुली

Santosh Deshmukh Murder Case
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मोठी अपडेट समोर आली आहे. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि मास्टरमाईंड आहेत. हे तिघेही सध्या एसआयटीच्या ताब्यात आहेत. या तिघांनी आपण संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. आपणच संतोष देशमुख यांचा खून केला असल्याचं आरोपींनी सांगून टाकलं आहे. तसेच असं कोणतं कारण होत ज्यामुळे इतक्या निर्घृणपणे संतोष देशमुखांना मारण्यात आलं ते सुद्धा आरोपींची कबुलीजबाबात सांगितलं आहे.

हत्येमागील कारण काय? (Santosh Deshmukh Murder Case)

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचे समजते. आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनता होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. त्यामुळे आपण संतोष देशमुख यांचा काटा काढला अशी कबुली सुदर्शन घुले याने दिली.

त्यासाठी आम्ही 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे सोबत बैठक झाली असं सुदर्शन घुले याने सांगितलं. तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ शुट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत. याप्रकरणातील आका असलेला वाल्मिक कराड हाच खरा हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात येतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार हे आरोपी आहे. 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. तर आता सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खून केल्याची कबुली दिल्याने वाल्मिक कराडचा पाय सुद्धा खोलात जाण्याची शक्यता आहे.