Santosh Deshmukh Murder Case | बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले आहे. आता याच प्रकरणाबाबत एक अतिशय महत्त्वाची घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे आता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे. पुण्यात त्याने स्वतः सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी देखील त्याची कसून चौकशी करत आहेत. आणि त्याला लवकरच कोर्टात देखील हजर करणार आहेत. सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिकी याने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यात एक मोठा दावा केलेला आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आत्ता 22 दिवस झालेले आहेत. या प्रकरणात अजूनही वाल्मिकी कराड याच नाव घेतलं जात होतं आणि त्यानुसारच आता त्याची चौकशी देखील करण्यात येणार आहे.
आरोपी वाल्मिकी कराड याच्यावर खंडणीचे आरोप लावण्यात आलेले आहे. तसेच इतरही काही गंभीर आरोप त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत. यासाठी सीआयडीने 9 पथके तयार केलेली आहेत. आणि महाराष्ट्र तसेच कर्नाटकमध्ये देखील या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात शोध घेत होता. त्याने स्वतःहून पोलिसांसमोर येऊन शरणागतीबद्दल आहे. हाती आलेल्या माहितीनुसार वाल्मिकी हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आणि मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. आणि त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी अनेक लोकांनी केली होती. परंतु आता सीआयडी खरंच वाल्मिकी कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करणार का? असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिलेला आहे.
पोलिसांना शरण जाण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडिओ शेअर करून संतोष देशमुख यांच्या हत्येशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचे सांगितलेले आहे. “मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी समोर हजर होत आहे. परंतु संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. केवळ राजकारणासाठी माझे नाव घेऊ नये. परंतु तरीही जर या प्रकरणात मी दोषी असेल, तर मला फाशी द्यावी,” असे वाल्मिकी कराड यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. वाल्मिकी कराड यांनी स्वतः शरणागती पत्करून असे वक्तव्य केल्याने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोर तसेच सीआयडी समोर अनेक नवीन प्रश्न उभी राहिलेले आहेत. आता हे प्रकरण नक्की कोणत्या दिशेला वळण घेईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.