संतपीठाचे अभ्यासक्रम तातडीने होणार सुरु, शैक्षणिक व्यवस्थापन बामू विद्यापीठाकडे

0
49
bAMU
bAMU
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच नऊ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय निर्गमित केला आहे. यामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे.

पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, कीर्तन, प्रवचन, तत्त्वज्ञान अशा बाबींशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन विद्यापीठाकडे पाच वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईपर्यंत जे लवकर होईल त्या काळासाठी सोपविण्याचा निर्णय काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे.

संतपीठातील अभ्यासक्रमाविषयी संतपीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य ते स्थान देण्यात येणार असून, तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम चालवण्यासाठी विद्यापीठाला आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची मानधन किंवा तासिका तत्त्वावर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपात बाह्य स्रोतामार्फत करता येऊ शकेल. यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्वनिधीतून करावा लागणार असून संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहील. फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here