हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरबाबत (Sara Tendulkar) एक मोठी बातमी समोर येत आहे. सारा तेंडुलकर आणि बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचं ब्रेकअप झालं असल्याचं बोललं जातंय. दोन आठवड्यांपूर्वीच सारा आणि सिद्धांत एकमेकांना देत करत असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या होत्या, मात्र आता अवघ्या १५ दिवसांतच त्यांच्या नात्याला फुल्ल स्टॉप लागला आहे. महत्वाचं म्हणजे सिद्धांतनेच हे ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकमेकांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर सगळं काही घडलं असं बोललं जात आहे. ई टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, सिद्धांत चतुर्वेदीने स्वतः हे नाते संपवले. सूत्राचा हवाला देत, त्यात म्हटले आहे कि, अलीकडेच दोघांचा ब्रेकअप अलिकडेच झाला. सिद्धांतनेच हा ब्रेकअप केला आहे. खरं तर सिद्धांत आणि सारा या दोघांनीही हे नाते गंभीरपणे सुरू केले होते. पण कुटुंबाच्या ओळखीनंतर ते दोघेही वेगळे झाले. कुटुंबाला भेटल्यानंतर त्यांचे नाते दीर्घकाळ टिकेल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही आणि दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सिद्धांत आणि सारा का वेगळे झाले? दोघांच्या ब्रेकअप मागे नेमकं काय कारण होते ते अजून समोर आलेले नाही.
याआधी, साराचे नाव अनेकदा क्रिकेटपटू शुभमन गिलशी जोडली जात होते परंतु गिलने अलीकडेच या अफवांचे खंडन करत म्हंटल होत कि तो फक्त त्याच्या क्रिकेट करिअरवर लक्ष्य देत आहे आणि कोणालाही तो डेट करत नाही. तर दुसरीकडे सिद्धांतचे नाव अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदाशी जोडले गेले होते. गेल्या वर्षी दोघे वेगळे झाले.
सिद्धांत चतुर्वेदीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने गली बॉयपासून सुरुवात केली. या चित्रपटामुळे त्याला खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली. यानंतर तो बंटी और बबली 2, गहराईयां, फोन भूत, खो गए हम कहाँ आणि युद्ध यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. आता तो धडक 2 आणि दिल का दरवाजा खोल ना डार्लिंगमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे साराने लंडनमधून बायोमेडिकल सायन्स आणि क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि ती सचिन तेंडुलकर फाउंडेशनशी सक्रियपणे जोडलेली आहे.




