औरंगाबाद | गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल दुचाकी चोरास वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असुन त्याच्याकडून 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 8 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. विकास विष्णू पटेकर वय 19, (रा .घाणेगाव झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे.
साजापूर येथे राहणारे इम्रान खान मुक्तार खान पठाण यांची ऑटो एनसिलरी कंपनीजवळ उभी असलेली दुचाकी 8 जुलै रोजी चोरीला गेली होती. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की, दुचाकी चोर एन आर बी चौकात दुचाकी विक्रीसाठी येणार आहे. या माहितीवरून सोपानी गौतम वावळे यांच्यासह पथकाने या ठिकाणी सापळा रचून विकास पटेकर यास ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.
त्यानंतर त्याची चौकशी केली त्याने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 1 लाख 80 रुपये किमतीच्या 8 मोटरसायकल जप्त केले आहे. याआधी त्याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यासह विविध ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोपानी गौतम वावळे, कयूम पठाण, पोना संजय हंबीर, प्रकाश गायकवाड, विनोद परदेसी, गवळी, अविनाश ढगे, गणेश पाटील यांनी केली आहे.