पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

औरंगाबाद : आज शहरातील शहागंज भागातील सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या समारंभाच्या पूर्वतयारीची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी करून कार्यक्रम नियोजन व यशस्वीतेबाबत संबंधीत अधिकारी यांना सूचना दिल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून पटेल यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, पुतळा तयार झाल्यानंतरही केवळ अनावरण झाले नसल्याने हा पुतळा उभारलेला नव्हता. अखेर आज या पुतळ्याचे अनावरण झाले. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र गर्दी होऊ नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी नकार दिला असे देसाई बोलताना म्हणाले.

यावेळी, शिवसेना नेते चंद्र्कांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय आदी सहा अनेक नागरिक तथा शिवसैनिकांची उपस्थिती होती.