हायवा ट्रक च्या धडकेत स्कूटीस्वार महिलेचा मृत्यू.

औरंगाबाद : हायवा ट्रकच्या धडकेत एका स्कूटी स्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी फुलंब्री तालुक्यात घडली. औरंगाबाद रस्त्यावर सावंगी नजिक असलेल्या निजीउड सीड्स कंपनीच्या परिसरात घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रीती पाटील (वय 35) वर्षे ठार झालेल्या महिलेचे नाव असून अन्य जखमी महिलेचे नाव कळू शकले नाही.

याबाबत पोलिसांनी सांगितले की स्कूटी वरून ( क्र. एम. एच 20 डीपी – 6730) दोन महिला औरंगाबादहुन फुलंब्री कडे रविवारी दुपारी जात होत्या यावेळी स्कुटी ला समोरून येणाऱ्या हायवा ट्रक ने ( क्र. एम. एच डी ई 7550) जोरात धडक दिली यात स्कूटी वरील सदर महिला हायवा चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्या जखमी अवस्थेत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून प्रीती पाटील यांना मृत घोषित केले.

तर दुसरी महिला जखमी असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस हे. कॉ. ए. डी पाचंगे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त आणि फुलंब्री पोलीस ठाण्यात जमा केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक मुगदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली पाचंगे करीत आहेत.