Saree Cancer | आज-काल भारतामध्ये कॅन्सर हा झपाट्याने वाढायला लागलेला आहे. स्त्रियांना त्याचप्रमाणे पुरुषांना वेगवेगळे कॅन्सर होतात. ज्यामुळे त्यांचा जीवही जातो. आजपर्यंत आपण ब्लड कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर यांसारखे कॅन्सरचे प्रकार ऐकले आहेत. परंतु तुम्ही कधी साडीचा कॅन्सर (Saree Cancer) ऐकला आहे का? कदाचित नसेल ऐकला, परंतु हे अत्यंत सत्य आहे की, आज काल साडीमुळे देखील अनेक महिलांना कॅन्सर झालेला आहे. केवळ साडीच काही इतरही अनेक प्रकारचे असे कपडे आहेत. जे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने परिधान केले, तर त्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.
एका संशोधनातून हे सिद्ध करण्यात आलेले आहे की, अनेक स्त्रियांना साडीचा कॅन्सर होतो. या कॅन्सरचा प्रसार भारतामध्ये जास्त प्रमाणात झालेला आहे. कारण भारतीय स्त्रिया या दररोज साडीचा वापर करतात. आता याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया
साडीचा कॅन्सर कसा होतो? | Saree Cancer
भारतातील अनेक भागांमध्ये अशा स्त्रिया आहेत, ज्या अगदी लहान वयापासून साडी नेसत असतात. साडी नेसताना महिला आतमध्ये कॉटनचा पेटिकोट वापरतात आणि कमरेला धाग्याने घट्ट बांधतात. यावेळी एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की, जर एखाद्या महिलेने एकच कपडा बराच वेळ घातला आणि तो कमरेला घासायला लागला, तर तिथली त्वचा सोलून काळी पडू शकते. अशावेळी तुम्हाला कर्करोगाचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे तुमच्या कपड्यांसोबत तुमची स्वच्छता देखील त्याला जबाबदार असते. या भागात उष्णता आणि आद्रता जास्त असते. त्यामुळे कर्करोगाचा धोका होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.
रिपोर्टमध्ये काय आहे?
हाती आलेल्या रिपोर्टनुसार भारतीय महिलांमध्ये आढळलेल्या एकूण कर्करोगांच्या प्रकरणांपैकी एक टक्के कर्करोगाची प्रकरणे साडी कॅन्सरची आहेत. त्याचप्रमाणे या साडीसोबत धोतराचाही समावेश करण्यात आलेला आहे. साडीच्या कॅन्सरचे नाव हे बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पहिल्यांदा दिले. एक 68 वर्षीय महिला त्यांच्या रुग्णालयात आलेली होती. जिला हा साडी कॅन्सर झाला होता. ती महिला वयाच्या 13 व्या वर्षापासून साडी नेसत होती. त्यामुळे तिला हा कॅन्सर झाला होता.
पुरुषांमध्ये टेस्टीकुलर कॅन्सरचा धोका
पुरुष टाइट आणि जीन्स घालतात. हे घट्ट कपडे परिधान केल्याने त्यांच्या शरीराला नुकसान होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील तापमान वाढते आणि शुक्राणूंची संख्या देखील कमी होते. याला टेस्टीकुलर कॅन्सर असे म्हणतात.
कपडे घालताना कोणती काळजी घ्यावी
त्या कपड्यांमुळे आपल्या त्वचेवर डाग पडतात असे कपडे परिधान करणे टाळा
घट्टपणामुळे तुमची त्वचा लाल होत असेल तर ते कपडे घालू नये.
कपडे घातल्यावर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते कपडे देखील घालू नये.
त्याचप्रमाणे तुमचे जर अंडरगारमेंट्स खूप घट्ट असतील तर त्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे अनेक लोक जिमसाठी घट्ट कपडे घालतात. त्यामुळे देखील समस्या उद्भवतात.