सोलापूर प्रतिनिधी । तरुण पिढी व्यसनाधिनतेच्या आहारी जात असल्याने सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. त्यातच वाढत्या व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे संसार ही उध्वस्त होतात . याबाबत जाणीव ठेऊन सामाजिक जनजागृती डोळ्यासमोर ठेवत पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील उपसरपंच भजनदास पवार हे गेल्या ७ वर्षापासून गावात १०० टक्के दारूबंदी व्हावी यासाठी पायात चप्पल घातली नाही आहे.
याचबरोबर भजनदास पवार गावातील व्यसनाधिनतेला कारणीभूत असलेल्या अवैध धंदेवाल्यांविरोधात संघर्ष करत आहेत. त्यांनी केलेल्या या संकल्पाला आज ७ वर्षे पूर्ण झाली. सात वर्षांच्या प्रखर संघर्षानंतरही गावच्या दारुबंदीसाठी त्यांची अनवाणी पायपीट सुरुच आहे.
या संकल्पाबाबत पवार सांगतात कि,’ वर्ष २०१२ मध्ये गावात एकाच वर्षात दारूमुळं १२ माणसं मृत्युमुखी पडल्यानं याबाबत काहीतरी केलं पाहिजे याभावनेतून जोपर्यंत गावात दारूबंदी आणि गाव दारूमुक्त होणार नाही तोवर अनवाणी राहण्याचा संकल्प घेतला.” भानुदास पवार यांच्या प्रयत्नांना गावात सर्वत्र कौतुक होत असून. त्यांच्या या संकल्पाबाबत गावात व्यसनमुक्ती अभियानाला हातभार लागत आहे.