सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शासनाने सरपंचांचे प्रश्न सोडवण्यात कुचराई केल्याचा आरोप करत सातारा जिल्ह्यातील 1400 ग्रामपंचायती आणि सातारा तालुक्यातील 190 ग्रामपंचायती यशस्वीपणे कामबंद आंदोलन पुकारले आहे. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी या बंदचे आवाहन केलं असून या बंदला जिल्ह्यातून पाठिंबा मिळाला आहे. आज राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून आजच्या दिवशी बंद यशस्वीपणे पार पडला असल्याचे सरपंच परिषदेकडून सांगण्यात आले.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सातारा जिल्हा कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची काळ्या फिती बांधून केलं कामबंद आंदोलन केले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नितिन पाटील, कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, उपाध्यक्ष अरूण कापसे, शत्रुघ्न धनवडे, चंद्रकांत सणस यांच्यासह सरपंच परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष काकडे यांनी केलेल्या आवाहनानुसार हा बंद पाळण्याता आला. सातारा तालुक्यात 5 ग्रामपंचायतीचे पुनर्वसन उरमोडी धरणातून विस्थापित करण्यात आली. या गावामध्ये राजकीय पुढारी फंड टाकतात, ग्रामपंचायतआहे, निवडणूक होते. मात्र ग्रामपंचायतीची खाते गोठवण्यात आलेली आहेत. तेव्हा या गोष्टीचा आम्ही धिक्कार करत असून योग्य निर्णय न झाल्यास पाच ग्रामपंचायतींना घेवून आमरण उपोषण मंत्रालया समोर करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.