व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सोमय्यांना फक्त नौटंकी आणि ड्रामेबाजी करायची होती; कोर्लई गावच्या सरपंचांची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या आज थेट कोर्लई गावातील ग्रामपंचायत कार्यालयात गेले. यानंतर गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी सोमय्यावर टीका करताना त्यांना पण नौटंकी आणि ड्रामेबाजी करायची होती अशा शब्दांत निशाणा साधला.

किरीट सोमेय्या ग्रामपंचायत कार्यालयात आले आणि त्यांनी फक्त 1 पत्र दिले आणि निघून गेले. आज त्यांना इथे येऊन काहीही बघायच नव्हतं , फक्त नौटंकी आणि द्रामा करायचा होता, पण आम्ही तो हाणून पाडला असे सरपंच प्रशांत मिसळ यांनी सांगितलं. आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप करायचं आणि त्यांची बदनामी करून हे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे. पण आम्ही त्यांचा डाव हाणून पाडला. असे सरपंच मिसाळ यांनी म्हंटल

सोमय्या पंचायत कार्यालयाच्या बाहेर येताच शिवसैनिकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केली. सोमय्या निघून जाताच शिवसैनिकांनी त्या जागेवर दूध आणि गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्याकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.