धक्कादायक ! भोंदूबाबाचा 27 वर्षीय महिलेवर बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका भोंदूबाबानं बनावट पूजा मांडून 27 वर्षीय पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. या भोंदूबाबानं पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्यानं पीडितेला पूजेत नग्नावस्थेत बसवून तिच्यावर अत्याचार केला आहे. हि घटना उघडकीस येताच गंगापूर पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

आरोपी भोंदूबाबाचं नाव कामील हुलाम यासीन शेख असं आहे. हा भोंदूबाबा परप्रांतिय असून गंगापूर गावातील पठाडे गल्ली येथील पत्र्याच्या खोलीत राहतो. आरोपी भोंदूबाबा कामीलनं आपले दोन साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ या दोन साथीदारांच्या मदतीनं पीडित महिलेवर अत्याचार केला आहे. आरोपी पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत मागील सहा ते सात महिन्यांपासून पीडितेवर बलात्कार करत होता. आरोपी साथीदार स्टॅलिस्टिंग ऊर्फ शिवराम जेम्स फर्नांडिस आणि अशोक भुजबळ हे पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत.

या दोघांनी पीडित महिलेशी संपर्क साधत पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर पीडित महिलाही आरोपींच्या जाळ्यात अडकली. पैशांच्या लोभापोटी आरोपींनी सांगितलेले सर्व आघोरी कृत करायला सुरुवात केली. पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर पूजेत नग्नावस्थेत बसावं लागेल अशी अट संशयित आरोपींनी पीडित महिलेला घातली होती. यानंतर आरोपी भोंदूबाबानं स्वत: आपल्या हातानं पीडित महिलेचे कपडे काढून तिला नग्नावस्थेत पूजेला बसवलं. यानंतर आरोपी भोंदबाबानं पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे. हा सगळा प्रकार मागच्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू होता. यानंतर पीडित महिलेने आरोपींविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment