सातारच्या युवतीने थेट गाठले राजस्थान : लग्राचे अमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या संशियतासह कुटुंबिया विरूध्द गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करून युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर संशयित पसार झाला. तेव्हा युवतीने संशयिताला वेळोवेळी फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही तसेच नंतर फोन बंद केला. यामुळे सातारा जिल्ह्यातील युवतीने थेट राजस्थान गाठले. तेथे गेल्यानंतर तिथे तिला युवकाच्या कुटुंबियांनी अपमानास्पद वागणूक देवून जातीवाचक शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्याने अखेर युवतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी युवकांसह 9 जणांवर गुन्हा दाखल केला.

जावली तालुक्यातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी बाबुलाल डोलाराम चौधरी (सध्या रा. राधिका टॉकीज चौक, सातारा, मूळ रा. राजस्थान) याच्या विरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, युवतीला वेळोवेळी धमकावून जातिवाचक शिवीगाळ केल्याने युवकाच्या कुटुंबीयांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. बाबुलाल चौधरी, पानीदेवी चौधरी, डोलाराम चौधरी, मोहनलाल चौधरी, भवरीदेवी चौधरी, ओमाराम चौधरी, अशोक चौधरी, मुकेश चौधरी, दिनेश चौधरी (सर्व रा. राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तक्रारदार युवती सध्या सातारा शहर परिसरात वास्तव्य करत आहे. 2018 मध्ये तिची व संशयित युवक बाबुलाल सोबत ओळख झाली. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यातून ती युवती पाचवेळा गरदोर राहिली. मात्र, युवतीची इच्छा नसताना संशयिताने कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र संशयित पसार झाला. युवतीने संशयिताला वेळोवेळी फोन केला. मात्र त्याने फोन उचलला नाही तसेच नंतर फोन बंद केला. यामुळे युवतीने राजस्थान गाठले. तेथे गेल्यानंतर तिथे तिला युवकाच्या कुटुंबियांनी अपमानास्पद वागणूक देवून जातीवाचक शिवीगाळ केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्याने अखेर युवतीने शहूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल करित आहेत.

Leave a Comment