सातारा : शेतात गेलेल्या वृध्दावर अस्वलाचा हल्ला, गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील सांडवली येथील एका वृध्दावर जंगली अस्वलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सिताराम सखाराम मोरे (वय- 65) हे हल्यात गंभीर जखमी झाले. आज गुरुवारी सकाळी 6. 30 च्या दरम्यान ही घटना घडली. उपचारासाठी सिताराम मोरे यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, परळी खोरेऱ्यातील सांडवली येथे अस्वलाने वृध्दावर हल्ला केला. या भागात जंगलाचा भाग मोठा असल्याने वन्य प्राण्यांचा वावरही मोठा आहे. पण अलीकडे काही हिंस्र प्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच सांडवली येथील सिताराम सखाराम मोरे हे वृद्ध गुरुवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान झऱ्याचे वावर या शिवारात माकडे हाकलायला गेले होते. तेथून परतत असताना अचानकच अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या वृध्द जबर जखमी झाले.

संरपंच गणेश चव्हाण यांनी याबाबची माहिती सांगितली आहे. ते म्हणाले, सिताराम मोरे हे शेताकडे गेल्यानंतर त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत ते घराजवळील अंगणात आले. अस्वलाने गळ्यावर हल्ला केल्याने मोठा रक्तस्राव झाला होता. तात्काळ ग्रामस्थांनी 108 ला कॉल केला. मात्र रूग्णवाहिका येण्यासाठी काही कालावधी लागणार होता. म्हणून वारसवाडी येथील दुधाच्या गाडीला बोलावून सांडवली ते पळसावडे असा 5 किलोमीटरचा प्रवास दुधाच्या गाडीतून केला. नंतर रुग्णवाहिका पळसवडे येथे पोहोचल्यानंतर तेथून थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात सिताराम मोरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना समजताच वनक्षेत्रपाल वन्यजीव बामनोलीचे बी. डी. हसबनीस, वनपाल वेळे डी. एम. जानकर, वनरक्षक पळसावडे ए.पी. माने, सरपंच गणेश चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.

Leave a Comment