सातारा | सातारा जिल्हा न्यायालयाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज दि. 20 रोजी जामीन मंजूर केला. छत्रपती घराण्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांना चार दिवसांच्या मिळालेल्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली हाेती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला होता, त्याबाबत कोर्टाने आज जामीन मंजूर केला.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती, त्यानंतर आली हाेती. यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी जामीन अर्ज केला. यावर पुन्हा युक्तिवाद झाला. मात्र, जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. मंगळवारीही याबाबत निर्णय झाला नाही. आज न्यायालयाने सदावर्ते यांना सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
सातारा पोलिसांचा ताबा ते कोर्टाचा जामीन मंजूर
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अर्थर रोड जेलमधून गुरूवारी दि. 15 रोजी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेथून सायंकाळी 5 वाजता सातारा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. गुरूवारची रात्र सातारा पोलिस जेलमध्ये काढल्यानंतर शुक्रवारी दि. 16 रोजी सातारा न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले. यावेळी सातारा कोर्टाने 4 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी दि. 18 रोजी न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे सातारा पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा त्याच दिवशी अर्थर रोड जेल प्रशासनाला ताबा दिला. त्यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज दि. 20 रोजी बुधवारी सुनावणी झाली. त्यामध्ये सातारा कोर्टाने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जामीन अर्ज मंजूर केला.