सातारा जिल्हा बँक निवडणूक : निकालाआधीच सहकारमंत्र्यांचा विजयी बॅनर; अतुल भोसलेंच्या फोटोने राजकीय वर्तुळात चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या कराड सोसायटी गटात काल रविवारी शांततेत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि अॅड. उदयसिंह पाटील यांच्यात कराड सोसायटी गटातून काटे की टक्कर पहायला मिळाली. मतदानाच्या दिवशी भाजप नेते अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांना उघड पाठिंबा दिल्यामुळे उदयसिंह पाटील यांना तोटा सहन करावा लागला. आता निकालाला एक दिवस बाकी असतानाच गोळेश्वर ग्रामपंचायतीनं सहकारमंत्र्यांचा विजयी बॅनर लावल्यानं त्याची सोशल मीडियात एकच चर्चा रंगली आहे. बॅनरवर बीभाजप नेते अतुल भोसलेंच्या फोटोने राजकीय वर्तुळात चर्चा सूर झाल्या आहेत.

गोळेश्वर ग्रामपंचायतीनं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचा फलक लावला असून या फ्लेक्समध्ये भाजप नेते अतुल भोसले यांचा देखील फोटो असल्यानं सर्वांचं लक्ष वेधत आहे. कार्यकर्त्यांना सहकारमंत्री विजय होतील, असा ठाम विश्वास आहे. मात्र निकाला आधीच बॅनर लावल्यानं सोशल मीडियात याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान गोळेश्वर येथे सदर बॅनर गावकऱ्यांनी लावला होता. बॅनरवर बाळासाहेब पाटील यांचा सातारा जिल्हा श. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजय झालेबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर लिहिलेला होता. शुभेच्छुकमध्ये गोळेश्वर व सर्व ग्रामस्थ असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच बॅनरवर य.मो. कृष्णा सहकरी साखर कारखान्याचे संचालक दयानंद भीमराव पाटील, जगदीश जगताप आदींचा फोटो होता.

गेल्या काही दिवसापूर्वी अॅड. उदयसिंह पाटील यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत माजी चेअरमन अविनाश मोहिते यांना उघडपणे मदत करत भोसले गटाला विरोध केला होता. मात्र 2009 साली डाॅ. अतुल भोसले आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे विधानसभेला एकमेकांच्या विरोधात होते. त्यामुळे भोसले गट तटस्थ राहील अशी आशा व्यक्त केली जात होती, किंवा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना मदत करेल असेही म्हटले जात होते. मात्र अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटीलांना उघडपणे पाठिंबा दिल्याने सहकारमंत्र्यांचे पारडे जड झाले आहे.

दरम्यान, चार वाजता लावलेले हे बॅनर एका तासातच उतरवण्यात आले. संध्याकाळी सहा वाजता हा बॅनर काढून ठेवण्यात आला होता. आता उद्या निकालालनंतर उदयसिंह पाटीलांचे बॅनर लागतात कि सहकरमंत्र्यांचे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment