सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी कारखान्यात संदर्भात जिल्हा सहकारी बँकेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेने कारखान्याला 96 कोटी रुपयांचे कर्ज दिल्या संदर्भात ही नोटीस आली असल्याचे बोलले जात आहे.
कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे असणाऱ्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 1 जुलै रोजी जप्तीची कारवाई करण्यासंदर्भात ईडीने नोटीस बजावली होती. या नोटीसी नंतर राज्यात राजकीय वातावरण चांगले तापलेले पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही ईडीची नोटीस आलेली आहे.
सातारा जिल्हा सहकारी बँक सोबत पुणे जिल्ह्यातील चार बँकांनीही जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला कर्ज पुरवठा केलेला आहे. जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई आली असल्याने या चार बँकाबरोबर सातारा जिल्हा बँकेचीही चौकशी करण्यासंदर्भात ही नोटीस असल्याचे बोलले जात आहे.