सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी

सातारा : जिल्हा बँक निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलमधून वाठार (ता. कराड) येथील ऋतुजा राजेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. तर त्यांच्यासोबत कांचन साळुंखे यांनीही विजय मिळवला आहे. ऋतुजा पाटील यांना १४४५ मते मिळाली आहेत तर कांचन साळुंखे यांना १२९२ मते मिळाली आहेत.

सातारा जिल्हा बँकेत निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी सहकार गटातून ऋतुजा पाटील आणि गेल्या टर्ममध्ये बँकेच्या संचालक असलेल्या कांचन साळुंके यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. कांचन साळुंके यांनी शारदादेवी कदम यांच्या वरती विजय मिळवला. तर ऋतुजा पाटील यांनी चंद्रभागा काटकर यांच्या वरती विजय मिळवला. सहकार पॅनल कडून दोन्ही महिला विजय झाले आहेत.

You might also like