सातारा | सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 588 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 777 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 10 हजार 342 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 5.69 टक्के इतका आहे.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 127 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोना बधितांची संख्या 2 लाख 24 हजार 691 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 11 हजार 447 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 453 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 20 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात 13 लाख 63 हजार नागरिकांचे लसीकरण
सातारा जिल्ह्यात करोना लसीकरण मोहीम 16 मार्चपासून सुरू झाली होती. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत 13 लाख 63 हजार 577 नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यापैकी नऊ लाख 62 हजार 51 नागरिकांना पहिला, तर चार लाख एक हजार 526 नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.