सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले 15 एप्रिल पर्यंत कलम 144 चे सुधारीत आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोविड 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2021रोजी दिलेल्या सुधारीत सुचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल 2021 पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत. हे आदेश 15 एप्रिल रोजीच्या रात्री 24 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे लागू राहतील.

I) सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करणेत येत आहेत

1) सातारा जिल्हयात रात्रीचे 08.00 वाजलेपासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील.

2) इयत्ता 9 वी पर्यंत सर्व वर्ग (निवासी शाळा वगळून), प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्सिटयुट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट बंद राहतील. तथापी, निवासी शाळा, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषता आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांचे वसतीगृह, इयत्ता 10 वी व त्यापुढील सर्व वर्ग, महाविदयालये, शैक्षणिक संस्था चालू ठेवणेस परवानगी असेल. ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील. ऑनलाईन शिक्षण आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील. त्यासाठी शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षीततेबाबत निर्धारित केले आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औदयोगिक प्रशिक्षण उपक्रम (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मंडळ किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयामध्ये, नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उदयोजकता प्रशिक्षण घेणेस परवानगी राहील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), भारतीय उदयोजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांना देखील परवानगी राहील. त्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण हे प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी, केवळ उच्च शिक्षण संस्था (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील. केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाले नंतरच प्रयोगशाळा / प्रयोगात्मक कामांसाठी विदयार्थांना बोलवणेस परवानगी राहील. इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विदयापीठे, खाजगी विदयापीठे, इत्यादी, ते केवळ संशोधन अभ्यासक (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/ प्रायोगिक कामासाठी परवानगी राहील.

सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करून काम करणेची परवानगी राहील. यशदा, वनमती, मित्र, एमईआरआय इत्यादी विविध सरकारी ऑफलाईन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात उघडण्यास परवानगी असेल. संबंधित प्रशासकीय विभागामार्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक असेल.

3) रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असलेस किंवा आदर्श कार्यप्रणालीनुसार चालू राहील.

4) सर्व सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम (यात्रा/जत्रा इत्यादी) तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा तसेच सभा मंडप, मोकळया जागेत होणारे इतर कार्यक्रम बंद राहतील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील.

5) सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत येत आहे.

6) पाच पेक्षा जास्त व्यक्तींना, रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यत एकत्र येणेस मनाई करणेत येत आहे.

7) शासकीय कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी, लोकप्रतिनिधी व्यतिरीक्त इतर अभ्यंगतांना बैठकीसाठी बोलविल्याशिवाय तसेच तातडीच्या कामाव्यतिरीक्त येणेस मनाई करणेत येत आहे.

II) सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील

1) मॉल, हॉटेल, फुड कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तसेच याच कालावधीमध्ये घरपोच सुविधा चालू राहील. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत बंद राहील.

2) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/थिएटर/मल्टिप्लेक्स/ नाटक थिएटर हे आसनाच्या 50% क्षमतेने सकाळी 7.00 ते सायंकाळी 8.00 या कालावधीतच चालू राहील. यामध्ये कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही तोपर्यत बंद राहील.

3) सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नैआ/कावि/437/2021 दि. 02/03/2021 मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झालेस रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करुन, शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमंत्ता बंद राहील. तसेच कार्यक्रम आयोजकांकडून रक्कम रुपये 10,000/-दंड व फौजदारी कारवाई करावी

4) उत्पादन क्षेत्र पुर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकेल. तथापि संबंधित आस्थापना यांनी मास्कशिवाय तसेच थर्मल स्किनींग शिवाय प्रवेश न देणे, सॅनिटायझरचा वापर तसेच उत्पादनाच्या ठिकाणी त्यांचे कामगारामध्ये पुरेसे सामाजिक अंतर, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित उत्पादक युनिट बंद राहील.

5) अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील.

6) सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 7.00 ते सायंकाळी 8.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत.

7) वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह)

8) कन्टेनमेंट झोन बाहेर, व्यवसायाच्या अनुषंगाने प्रदर्शनास परवानगी राहील. त्यासाठी औद्योगिक विभागाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

9) सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैदयकीय आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवा पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील.

10) ऑक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे.

11) आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेवर कार्यरत राहतील.शासकीय / निमशासकीय कार्यालयाच्या बाबतीत कार्यालय प्रमुखांनी कोविड -19 चे नियमाचे पालन करुन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेणेत यावा.

12) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात स्थनिक साप्ताहीक बाजार (जनावरांसह) उघडणेस परवानगी राहील. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

13) राज्य व केंद्र शासनाने कोविड 19 बाबत ठरविलेल्या राजशिष्ठाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवट पर्यत प्रवास मुभा राहील.रेल्वेने रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी व मुद्रांकन करणेची आवश्यक नाही. तथापी कोविड- 19 च्या अनुषंगाने या प्रवाश्यांनी सामाजीक आंतर व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे.

14) केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/1572/2020 दि. 27/06/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.

15) सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/1477/2020 दि. 11/06/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.

16) इंनडोअर हॉल मधील खेळाच्या सुविधा चालू करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2740/2020 दि. 19/10/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.

17) सातारा जिल्हयातील व्यायामशाळा चालू करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2765-अ/2020 दि. 23/10/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.

18) सातारा जिल्हयातील पर्यटन स्थळे खुली करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2923/2020 दि. 04/11/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.

19) राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिडापट्टूंच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जलतरण तलावांना परवानगी देणेत येत आहे. यासाठी क्रिडा व युवा व्यवहार विभागाकडून निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

20) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात योग संस्था चालु करणेस परवानगी राहील. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.

21) बॅडमिंटन, टेनिस स्क्वॅश, इनडोअर शुटिंग रेंज इ. सर्व खेळांमध्ये शारिरीक व स्वच्छताविषयक पालन करुन चालु करणेस परवानगी राहील.

22) धार्मिक स्थळांच्या ट्रस्ट/बोर्डाने/अधिकृत केलेल्या निर्णयानुसार कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्व सामान्यांसाठी चालू करणेत येत आहेत. तथापि, मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/ डीआय एसएम-1 दि. 14/11/2020 अन्वये निर्गमित करणेत आलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच, मास्कशिवाय प्रवेश न देणे. विश्वस्तांनी थर्मल स्किनींग केले शिवाय भाविकांना प्रवेश न देणे, सॅनिटायझरचा वापर करणे. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे परीसरातील उपलब्ध जागेचा विचार करुन, सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी प्रतितास किती भाविकांना प्रवेश द्यावा याबाबतची निश्चिती करावी. शक्यतो दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करावी.

23) राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण संस्था व क्रीडा स्पर्धा / बैठक/ खेळांचे आयोजन आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी विविध संस्था यांना कंटेनमेंट झोनच्या बाहेर काम करण्यास परवानगी असेल. यामध्ये राज्यातील विविध खेळांच्या स्पोर्टस ॲकॅडमीचा समावेश असेल. तसेच क्रीडा व युवा कार्य विभागामार्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.

24) गृह अलगीकरणास खालील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल.

1.गृह अलगीकरण झालेल्या नागरीक/रुग्णाविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायीकाच्या (डॉक्टर) यांच्या देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक आहे.

2. कोविड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसापासून 14 दिवसांपर्यत दर्शनी ठिकाणी फलक लावावा, जेणेकरुन त्या ठिकाणी कोविड – 19 रुग्ण असलेची माहिती नागरीकांना होईल.

3. कोविड -19 संक्रमित रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine) असा शिक्का उमटवावा.

4. कोविड -19 रुग्ण गृह अलगीकरण ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तिंनीही कमीत कमी संपर्क ठेवावा.तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही,याची दक्षता घ्यावी

5. गृह अलगीकरणाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस, कोविड -19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरीक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये (CCC) स्थलांतरीत करावे.

25) RTPCR चाचण्यांचे प्रमाण विशेष प्रयत्न करुन 70 %पेक्षा अधिक प्रमाणात वाढविण्यात यावे.

26) कोविड-19 सकारात्मक व्यक्तिंचे संपर्क शोधणे – सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींचे तात्काळ अलगीकरण करणे, त्याचे संपर्क शोधुन काढून त्यांचे अलगीकरण करणे बंधनकारक असेल. अशा संपर्कातील व्यक्ती किंवा कोविड -19 बाधित रुग्णास गृह अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नसलेस संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.

27) विहीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या आणि रुग्ण संपर्क शोधणे याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची जबाबदारी स्थानिक प्रशासन, पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाची असेल.

28) मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी पारित केलेले आदेशामध्ये नमूद केलेल्या सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. तसेच अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,सातारा यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाव्दारे परवानगी देणेत आलेली कृती करणेस मुभा राहील.

III) कोविड -19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झालेस दंडात्मक/फौजदारी कारवाईस पात्र राहील

1) सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारावा.

2) सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा

3) दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन झालेस ग्रामीण भागासाठी र.रु.2000/- व शहरी भागासाठी र. रु. 3000/- दंड आकारावा. तसेच 7 दिवसापर्यत दुकान सक्तीने बंद करावे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.

4) हॉटेल, रिसॉर्ट, लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजीत करणेत आलेल्या कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नैआ/कावि/437/2021 दि. 02/03/2021 नुसार कार्यवाही करावी.

5) जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

6) पाच पेक्षा जास्त व्यक्तींना, रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यत एकत्र आल्यास प्रत्येकी रक्कम रुपये 1000/- दंड आकारावा.

7) बाग, उदयाने आणि करमणुकीच्या उददेशाने सार्वजनिक मोकळया जागा रात्री 08.00 ते सकाळी 7.00 वा या कालावधीत बंद राहतील. उल्लंघन करणाऱ्यावर प्रत्येकी 1000/- दंड आकारावा.

8) सार्वजनिक वाहतुक काही निर्बंधासह चालू करणेत आली आहे. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यास रक्कम रुपये 500/- दंड आकारणेत येईल. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने करावी.

IV) कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील

1) शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे.

2) कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. THERMAL SACNNING, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची ENTRY POINT व EXIT POINT वर व्यवस्था करावी.

3) कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे.

V) आरोग्य सेतु ॲप चा वापर – जिल्हयातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.

VI) ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो, त्या ठिकाणी CONTAINMENT ZONE जाहिर करणेचे अधिकार INCIDENT COMMANDER म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देणेत आलेले आहेत. संबंधित CONTAINMENT ZONE बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील. हा आदेश CONTAINMENT ZONE वगळता सातारा जिल्हयातील इतर क्षेत्रासाठी लागू राहिल तसेच CONTAINMENT ZONE बाबत त्या त्या क्षेत्रातील INCIDENT COMMANDER यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच CONTAINMENT ZONE INACTIVE झालेनंतर सदर क्षेत्राला इकडील आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने CONTAINMENT ZONE जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील.

कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, सदर आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करून किंवा नवीन आदेश पारीत करून या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 27/03/2021 मधील Annexure III मध्ये नमूद केलेप्रामणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment