डोकेदुखी कमी होईना : सातारा जिल्ह्यात नवे 780 पॉझिटिव्ह, 9 बाधितांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 780 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 85 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 379 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 92 हजार 587 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 79 हजार 31 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 354 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 9 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 8 हजार 585 जणांचे नमुने घेण्यात आले.

जिल्ह्यात 20 शासकीय रुग्णालयांमध्ये मेडीकल ऑक्सिजन निर्मिती होणार

कुपर कार्पोरेशन प्रा.लि यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी केलेल्या करारानुसार सातारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जनरेटर सेट बविण्याचे काम पूर्ण केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांच्याशी केलेल्या करारानुसार अगदी नाममात्र भाडे तत्वावर जनरेटर सेट बसवून प्रशासनाला मदत केली आहे. अजुनही 5 जनरेटर सेट बसविणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी शासकीय रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मेडिकल ऑक्सिजन निर्मिती होणार असून भविष्यात येणाऱ्या कोविड विषाणूच्या तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे.