व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सातारा जिल्हा कारागृहात बंदीकडूनच पोलिसाला मारहाण

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्हा कारागृहात शुक्रवारी जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या आरोपीकडून पोलिसाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी बंदीने पोलिसास शिवीगाळ करत जीवे मारण्याचीही धमकी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील जिल्हा कारागृहात अनेक कैदी ठेवण्यात आलेले आहेत. शुक्रवारी कारागृहात कामावर असलेले कारागृहातील पोलीस कर्मचारी रणजित गोपीचंद बर्गे (वय 40, रा. मोळाचा ओढा, सातारा. मूळ रा. खांडज, ता. बारामती, जि. पुणे) हे काम करीत होते. यावेळी कारागृहात बंदी म्हणून असलेल्या काशीनाथ उर्फ काश्या सोनबा जाधव (वय 37, रा. आंधळी, ता. माण) याने बर्गे यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये रणजित बर्गे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

पोलिसास मारहाण केल्या प्रकरणी आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित बंदी असलेल्या आरोपीवर जिन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत बंदी विरोधात पोलीस रणजित गोपीचंद बर्गे यांची तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार दळवी तपास करीत आहेत.