सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यात दि. 12 ते 24 जुलै या कालावधीत शिवसंपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातही या शिवसंपर्क अभियानाचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मंत्री सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला.
सातारा येथे पार पडलेल्या शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री उदय सामंत म्हणाले कि, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक पक्षातील श्रेष्टींकडून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची एकत्रित बैठक घेत गावागावात १२ जुलै ते २४ जुलै या कालावधीत शिवसंपर्क अभियान राबवावे,असे आदेश दिले.
जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले कि, विरोधकांकडून डिवचण्याचा प्रयत्न केले जात आहेत. पक्षातील मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही विरोधकांकडून टीका केली गेली आहे. विरोधकांना एकच सांगायचं आहे कि, आम्हाला सारखं सारखं डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही बारा दिवसात बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही. याचे नियोजन बारा दिवसात करायचे आहे, असा इशारा मंत्री सावंत यांनी दिला.
मंत्री सामंत म्हणाले कि, विरोधकांकडून आज पक्षावर व मुख्यमंत्री यांच्यावर सतत टीका होत आहे. आत्यांच्याकडून अनेक षडयंत्र रचले जात आहेत. त्यांचे हे षडयंत्र आपल्याला शिवसंपर्क अभियानातून हाणून पडायचे आहे. यासाठी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने ग्रामी भागात शिवसंपर्क अभियान वाढवावे. गावागावात हे अभियान राबविण्याअगोदर तसेच याबाबत बैठका घेण्याअगोदर गावात पक्षाच्या शाखा उघडाव्यात. नंतरच त्या ठिकाणी बैठका घ्याव्यात.
माझी आज परीक्षा रद्द करणारा मंत्री म्हणून ओळख
सातारा जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाच आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी घेतलेल्या परीक्षा रद्दच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले कि, कॉरोनमुळे मी जेव्हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज मला विध्यार्थी हे परीक्षा रद्द करणारा मंत्री म्हणून ओळखत आहेत. मात्र, भविष्यात परीक्षा या घ्याव्याच लागणार आहेत. पण आजही विध्यार्थ्यांच्या मनामध्ये कोरोनाबाबत भीती असल्याचेही त्यांनी सांगितले.