सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी जाहीर; समितीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या व जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यांच्या निवडी अखेर सोमवारी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये नामनिर्देशित विधीमंडळ सदस्यांमधून राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील व फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या २० सदस्यांपैकी १२ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत.

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून तयार झालेल्या या महाविकास आघाडी सरकारकडून सातारा जिल्ह्यातील महत्वाचा समजला जाणारा नियोजन समितीमधील निमंत्रित सदस्यांच्या निवडीचा प्रश्न गेल्या एक ते दिड वर्षांपासून प्रलंबित होता. तो आज निकाली काढण्यात आला.

निवडी करण्यात आलेल्या सध्यासमध्ये नामनिर्देशित विधीमंडळ सदस्यांमधून राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडले आहेत. तर जिल्हा नियोजन समितीचे ज्ञान असलेल्या सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे दोन काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्याची निवड केलेली आहे. निमंत्रित १४ सदस्यांमध्ये राष्ट्रवादीचे ८, काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी ३ सदस्य निवडण्यात आले आहेत.

अशा प्रकारे झाल्या आहेत निवडी –

विधीमंडळ सदस्यांमध्ये – राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण,

नामनिर्देशित सदस्यांमध्ये – राष्ट्रावादीचे सुनील माने, बाळासाहेब भिलारे, काँग्रेसचे विजयराव कणसे, शिवसेनेचे जयवंत शेलार सदस्य झालेत.

विशेष निमंत्रित नामनिर्देशित सदस्यामध्ये – धैर्यशील अनपट, ॲड. शामराव गाढवे, सतीश चव्हाण, दीपक पवार, सुरेशचंद्र काळे, सागर साळुंखे, प्रभाकर देशमुख, संतोष पाटील (राष्ट्रवादी), अशोक गोडसे, जयवंतराव जगताप, हिंदूराव पाटील (काँग्रेस) शेखर गोरे, राजेश कुंभारदरे, राहुल बर्गे (शिवसेना) यांचा समावेश आहे.

Leave a Comment