सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
साताऱ्यातील एका महिला डॉक्टरला अनोळखी मोबाईल नंबरवरुन खंडणीसाठी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. एका मेसेजमधून ८० हजार रुपये खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. हा मेसेज अज्ञात व्यक्तीने दाऊद गँगच्या नावाने इंग्लिश मधून पाठवला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार , दिनांक १२ डिसेंबर रोजी साताऱ्यातील महिला डॉक्टरला मोबाईलवर मेसेज आला त्यामध्ये ‘नीता इफ यू वांट गिव्ह ८०००० विल शूट यू ॲन्ड यूअर फॅमिली सून. दाऊद गँग’ असा मेसेज करत जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली आहे.
हा मेसेज महिला डॉक्टर यांनी वाचल्यानंतर त्या घाबरल्या आणि सातारा सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना मेसेजबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला असून हा नंबर कोणाचा आहे याचा तपास करीत आहेत.