सातारा : फेल लोकप्रतिनिधीं, प्रशासनाचा फेल कारभार झाकण्यासाठी पत्रकारांना बैठकीतून बाहेर काढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली असून त्यावर अकुंश ठेवण्यासाठी पुढाकार करणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन फेल झालेले आहे. या फेल झालेल्यांनी शुक्रवारी 16 जुलै रोजी कोरोनाच्या अनलाॅकसाठी आयोजित बैठकीतून लोकांच्या आवाज असणाऱ्या पत्रकारांना बाहेर काढले. केवळ आपला फेल झालेला कारभार झाकण्यासाठी आणि नियोजनशून्य व्यवस्थापन झाकण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केलेला दिसून आला.

सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंन दिवस वाढत आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांपेक्षा सातारा शहरात कोरोना परिस्थिती वाईट आहे. जिल्ह्यातील कृष्णा कारखाना निवडणुकीनंतर कारखाना कार्यक्षेत्रातील रूग्ण वाढत आहेत. तर गुरूवारी 16 जुलै रोजी बकरी ईदच्या सणानिमित्त बकरी खरेदीसाठी तोबा गर्दी जमा झाली होती. अशावेळी प्रशासन झोपलेले होते का? की लोकप्रतिनिधींना गांधारीची भूमिका घेतली होती.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सभापती रामराजे निबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखरसिंह, पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी यांच्यासह काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

लसीकरणांच्या प्रश्नानंतर पत्रकारांना बाहेर काढले

कोरेगाव मतदार संघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जिल्ह्यात आलेली लस आणि प्रत्येक तालुक्याला मिळालेली लस यांची आकडेवारी मागितली. तेव्हा प्रशासनाकडून टक्केवारीत आकडेवारीत सांगितली असता, महेश शिंदे म्हणाले, टक्केवारी नको किती आली आणि दिली यांची सविस्तर माहीती नाही का असा सवाल केला. याच प्रश्नानंतर जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी पत्रकारांनी बाहेर जावावे, असे सांगितले.

Leave a Comment