सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातारकरांसाठी मात्र एक गुड न्युज आहे. जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोना पोझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ४ कोरोना बाधितांपैकी पहिले दोघे बरे झाले असल्याचे समजत आहे.
जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेल्या पहिल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांचे पहिल्या १४ दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून १५ व्या दिवसासाठीचे उद्या पाठविले जातील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, सातारकरांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण आहे. या दोन्ही रिपोर्ट बरोबर दुसरे आठ रिपोर्टही निगेटिव्ह आले असल्याची माहितीही गडिकर यांनी दिली आहे. पहिल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे १५ व्या दिवसाचे नमुने उद्या पाठवणार असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तरुणाईचं मन आणि हृदय लॉकडाऊन करणारी भारताची ‘एक्सप्रेशन क्वीन’
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला
राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत
अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम
उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..