हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा. (Satara Lok Sabha Election 2024) काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या साताऱ्याची ओळख. शरद पवारांचा हक्काचा मतदार संघ असा साताऱ्याचा लौकिक. देशभर सातारा लोकसभा म्हटलं कि २०१९ च्या पोटनिवडणुकीतील पावसातली सभा आठवत नाही असा माणूस क्वचित सापडतो. २०१९ नंतर आता २०२४ लासुद्धा साताऱ्यात शरद पवारांचाच खासदार निवडणूक जिंकेल असं एकंदर वातावरण होतं. राजकीय परिस्थितीही मोठ्या पवारांच्याच बाजूची बनली होती. साताऱ्यात यंदा तुतारीचाच आवाज घुमणार असं जवळपास फिक्स मानलं जात होतं. स्वतः भाजपनेही साताऱ्यातील वाऱ्याचा अंदाज घेऊन आपल्या हवेची दिशा थोडीशी बदलण्याचा निर्णय घेतला होता. पण मागील १० दिवसांत साताऱ्यात वारं फिरलं असल्याचं बोललं जातंय. हातात आलेला विजय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने कसा गमावलाय? साताऱ्यात शशिकांत शिंदे निवडणूक हारतील का? शरद पवारांच्या तुतारीची बेरीज नक्की चुकली कुठं? शरद पवारांची साताऱ्यात सभा झाली पण हवा नाही असं का? हेच आपण पाहणार आहोत.
सातारा जिल्ह्यातील बराचसा भाग हा सह्याद्री डोंगररांगात येतो. आता सह्याद्री म्हटलं कि तिथं वारं आलं अन वारं म्हटल्यावर वारं तर फिरणारच. कधी इकडं तर कधी तिकडं. पण सध्याचं हे फिरलेलं वारं मात्र जरा वेगळंय. ते डोंगराळ पट्ट्यातनं फिरलंय यावर आम्ही ठामय. साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) अशी लढत लागलीय. सुरवातीला मविआच्या बाजूने वणवे वाटणारी हि निवडणूक आता २९० डिग्री मध्ये फिरल्याची चर्चा आहे. साताऱ्यात शशिकांत शिंदे निवडणुकीत पराभूत होतील का या मेन विषयाला हात घालण्यापूर्वी प्रथम शरद पवार गट साताऱ्यात विनवीन सिच्युएशन मध्ये होता असं आम्ही का म्हणतोय ते पाहुयात.
एकतर शरद पवार यांचा स्टँडिंग खासदार साताऱ्यात असणं हि पवारांची सर्वात जमेची बाजू. तसेच या विद्यमान खासदाराचं रिपोर्ट कार्ड मजबूत असणं म्हणजे मागच्या कार्यकाळात चांगली विकास काम केलेली असणं हि दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट. आता तिसरी बाब म्हणजे साताऱ्यात कायम चालणारा पवार फॅक्टर अन विरोधी पक्षाला लवकर त्या तोडीचा उमेदवार न सापडणं. इतिहासात डोकावलं तर लक्षात येतं सातारा लोकसभा मतदार संघात काँग्रेस अन राष्ट्रवादीच्या विचारांचा पगडा राहिलाय. कितीतरी आले अन गेले मात्र या जिल्ह्यानं पुरोगामी विचारांनाच साथ दिलीय. या सर्व बाबी मोठ्या पवारांना साताऱ्यात विनवीन सिच्युएशन मध्ये घेऊन जातात.
पण असं असलं तरी यंदा मात्र पवारांचं (Sharad Pawar) साताऱ्यातलं गणित बिघडणारेय. साताऱ्यात यंदा पवारांची जादू जरा कमीच चालेल असं एकंदर जाणवतंय. पवार फॅक्टर यंदा साताऱ्यात तितकासा चालणार नाही असं का? तर याच पहिलं कारण म्हणजे उमेदवार निवडीत कराडकरांचा झालेला गेम. १९९९, २००४ साली श्रीनिवास पाटील कराडचे खासदार झाले. तर त्यापूर्वी १९९१ ते १९९९ पर्यंत पृथ्वीराज चव्हाण कराडचे खासदार बनले. २००९ मध्ये मात्र कराड लोकसभा मतदार संघ फुटला अन त्याचा काही भाग सातारा अन काही भाग सांगलीला जोडला गेला. यानंतर झालेल्या निवडणुकीत शरद पवारांनी उदयनाराजेंना निवडणुकीत उतरवलं अन २०१९ पर्यंत राजे येथून खासदार झाले. २०१९ च्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपात गेलेल्या उदयनराजेंना श्रीनिवास पाटीलांनी कराड भागातुन मिळाल्या लीडच्या जोरावर चितपट केलं. आता २०२४ ला प्रथमच उदयन महाराज विरुद्ध कराडच्या बाहेरचा उमेदवार अशी लढत होतेय अन आता यात कराडकर उदयनराजेंना साथ देतात कि शरद पवारांना यावर सगळं गणित अवलंबून आहे. कराडची जनता लीड कोणाला देईल माहिती नाही पण उदयनराजेंचं कराड भागातील लीड मागच्या वेळच्या तुलनेत वाढेल इतकं नक्कीय. अन याचं कारण ठरणारेय कराडचा स्थानिक उमेदवार निवडणूक रिंगणात नसणे.
यातलं दुसरं कारण म्हणजे शरद पवार गटात मागील काही दिवसांत झालेले अंतर्गत वादविवाद. एकीचं बळ जोवर असतं तोवर ताकद टिकून असते पण कराड उत्तर अन पाटणचे शरद पवारांच्या गटातील नेते विद्यमान खासदारांवर नाराज असलेल्या बातम्या आऊट झाल्या अन त्यामुळं मतदार संघात निगेटिव्ह वातावरण तयार झालं. यासगळ्यात कराडच्या उमेदवाराचा गेम होऊन उदयनराजेंची कराड भागातील लीड वाढवण्याची वाट मोकळी झाली. पाटणच्या सभेत विद्यमान खासदारांचा फोटो न लावण्याच्या ट्रेंडला आता एन निवडणूक प्रचार सुरु झालेला असताना सुद्धा कॅरीऑन करणं शरद पवार गटाच्या अंगलटि येऊ शकतं असं खाजगीत लोकं बोलतायत. कराड शहरात लागलेल्या तुतारीच्या एकाही पोस्टरवर विद्यमान खासदारांचा फोटो नसल्याने मतदारांत याचा चुकीचा मेसेज जात असल्यानं शिंदेंना याचा जोरात फटका बसू शकतो.
आता यातलं महत्वाचं तिसरं कारण म्हणजे पाटण आणि कराड उत्तर भागात उदयनराजे भोसले यांना लीड वाढण्याची शक्यता…. मागील लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभेत काँग्रेसच्या मतदारांनी घड्याळाला साथ दिलेली पण पाटण आणि कराड उत्तर या विधानसभेत अगदी भाजपच्या मतदारांनीसुद्धा श्रीनिवास पाटील यांना स्थानिक उमेदवार आणि प्रभावी चेहरा म्हणून मतदान केलं होतं. त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कराड भागातून मोठं लीड मिळून विजय निश्चित झाला होता. यंदा मात्र शरद पवारांना या फॅक्टरचा फायदा होणार नसल्याची ग्राउंड रिएलिटी आहे. तसेच वाई, कोरेगाव, जावळी अन सातारा शहरातही उदयराजे प्लस मध्ये राहून निवडणूक खिशात घालू शकतात अशी शक्यता आहे. पाटण भागात उदयनराजे यांना मोठं लीड मिळेल असा दावा भाजपचे लोक करतायत त्यातही काहीतरी तथ्य असल्याचं समजतंय.
चौथं कारण म्हणजे भ्रष्टचारी उमेदवारी अशी शशिकांत शिंदे यांची प्रतिमा निर्माण करण्यात भाजपला मिळालेलं यश …… शशिकांत शिंदे यांची उमेदवारी शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आली त्याच दिवशी वर्तमान पत्रात शिंदे यांच्या मार्केट यार्डातील घोटाळ्यांबाबतची बातमी छापून आली. सामान्य मतदार यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना डिस्टर्ब झाला असून त्याचा फटका तुतारीला बसू शकतो असा अंदाज आहे. सुरवातीला यामुळे शिंदे यांना सहानुभूती मिळेल अशी चर्चा होती मात्र ग्राउंड रिएलिटीत तर वातारवरन शिंदेच्या विरोधात फिरल्याचं दिसतंय.
आता बोलूयात शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेवर. …. तर नरेंद्र मोदी यांच्या कराडातील सभेला पवारांनी साताऱ्यातील सभेत प्रत्युत्तर दिलं खरं पण मागील पोटनिवडणुकीप्रमाणे वातावरण निर्मिती करण्यात महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यंदा सभेत पाऊसही पडला नसल्यानं नुसत्या निष्ठावंत असं स्वतःला म्हणवून घेऊन हि निवडणूक जिंकता येणं सध्यातरी शिंदेसाठी कठीण आहे. एकंदर या सर्वाचा आढावा घेतल्यावर शरद पवारांची यंदा साताऱ्यात तुतारीच्या बेरीज चुकलीय असं म्हणायला वाव आहे. याचा अर्थ उदयनराजे भोसले यांच्याबाजूने खूप मोठे मताधिक्य आहे असा नाही परंतु पवारांचा निष्ठावंत बॅकफूटवर पडत असल्यानं उदयनराजे निवडणुकीत सरशी मारतील अशी शक्यता अधिक आहे. लेट्स सी काय होतं?